RSS

लंपन चे भावविश्व – भाग १ (वनवास, शारदा संगीत) – प्रकाश नारायण संत

06 मे
Vanvaas by Prakash Narayn Sant

Vanvaas by Prakash Narayn Sant

खरंतर लंपन चे भावविश्व हे एक पुस्तक नाही. ते भावविश्व ४ पुस्तकांमध्ये पसरलंय. त्यामुळेच त्यातलं एक पुस्तक घेऊन त्यावर लिहिणे हे जरा कठीण चं आहे. ज्यांनी प्रकाश नारायण संतांचे एक तरी पुस्तक वाचलंय ते लंपन ला नीटच ओळखत असतील. नुसताच लंपन नाही तर सुमी, बाबुराव, कर्णबर्गी गंग्या, जंब्या काटकोळ आणि इतर एकोणतीस गुणिले एकोणतीस गुणिले एकोणतीस लोकांनासुद्धा.

लंपन हा संतांचा मानसपुत्र. वय साधारण ११-१२ असेल. महाराष्ट्र कर्नाटक च्या सीमेवरील गावात त्याच्या आजी आजोबांबरोबर राहणारा. आई वडील हे दुसऱ्या गावी राहत असलेले. लंपन चे भावविश्व बऱ्याच प्रमाणात प्रकाश नारायण संतांच्या आयुष्यावर बेतलेले आहे. त्याबद्दल संतांनी पण वेळोवेळी सांगून ठेवलंय. (नुकत्याच प्रकाशित झालेल्या व त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या ‘अमलताश’ या पुस्तकात या बद्दल सविस्तर माहिती असल्याचे ऐकून आहे. कोणी ते पुस्तक वाचले असल्यास विवेचन जरूर शेयर करावे.)

तर असा हा लंपन. तो, त्याचे संशोधक आजोबा, कडक स्वभावाची आजी (जिला आजोबाही अगदी बिचकून असतात), घरगडी बाबूराव, मैत्रीण सुमी, आणि त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या असंख्य लोकांची गोष्ट म्हणजे वनवास, शारदा संगीत, झुंबर, आणि पंखा ही चार पुस्तकं.

लंपन ची ओळख जगाला ६४ साली सत्यकथेतून वनवास नावाच्या कथेने झाली. पण त्यापुढे मात्र त्याची जास्त ओळख व्हायला ३० वर्ष लागली. संतांनी वनवास या एका कथेनंतर तब्बल तीस वर्षांनी पुढच्या कथा लिहिल्या. कधी कधी मला खूप वाईट वाटतं. संतांनी त्या ३० वर्षात लंपन बद्दल मौन नसतं बाळगलं तर आज कितीतरी सुंदर सुंदर लंपन च्या गोष्टी वाचायला मिळाल्या असत्या याचा विचार करून मनात हुरहूर वाटते. (इतक्यात प्रकाशित झालेल्या चांदण्याचे बेट  या पुस्तकात लंपनच्या अजून नवीन गोष्टी आहेत असे ऐकून आहे.) (मृणाल यांनी कॉमेंट्स मधे सांगितल्या प्रमाणे पुस्तकाचे नाव चांदण्याचा रस्ता असे आहे आणि त्यात लंपन ची एकाही गोष्ट नाही हे ऐकून वाईट वाटले)

वनवास आणि शारदा संगीत या दोन्ही पुस्तकांमधल्या गोष्टी अतिशय सध्या सोप्या आणि रोजच्या घडामोडीतल्या आहेत. म्हणूनच बहुदा त्या मनाला जास्त भावतात. मला ही पुस्तकं वाचताना नेहमी असं वाटतं की तो लंपन म्हणजे मीच आहे. लंपन चे कित्येक मित्र हे हुबेहूब माझ्या मित्रांसारखे भासतात. आपल्यालाही एखादी सुमी सारखी मैत्रीण असायला हवी होती असं मनात कुठेतरी वाटत राहतं.

त्यातून संतांनी लंपन च्या आजूबाजूचं जे चित्र उभं केलंय ते निव्वळ अप्रतिम आहे. लंपन चं घर, त्याची शाळा, शारदा संगीत विद्यालय, लंपन पेक्षा चाळीस एक वर्षांनी मोठे आणि तरीही लंपन ला गुरु म्हणणारे त्याचे संगीतातले शिष्य, तो कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा निसर्गरम्य परिसर हे सगळं पुस्तक वाचताना डोळ्यांसमोर अगदी मूर्तिमंत उभं राहतं. मी खरंतर कधी बेळगाव ला गेलेलो नाहीये, पण जर गेलोच तर मला खात्री आहे की लंपन मुळे तो परिसर मला नक्की ओळखीचा वाटेल.

तीच गम्मत भाषेची. वंटमुंगीकर देसाई, जंब्या काटकोळ, फासक्या बारदेसकर, गुंडीमठ रस्ता ही अशी नावं त्या भागात जन्म काढल्याशिवाय सुचायची नाहीत. सर्व कथांमधलं ते बेळगावी मराठी सुद्धा अतिशय सुंदर आहे. पुस्तकं वाचताना आपसूकचं ते हेल काढून वाचल्या जातं.

शारदा संगीत आणि वनवास ही दोन्ही पुस्तकं लंपन च्या लहान लहान गोष्टींनी भरलेली आहेत. प्रत्येक गोष्ट लंपन च्या आयुष्याचा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा एक वेगळंच पैलू दाखवते. त्यातली मजा त्या कथेच्या नाट्यात नाही, त्याच्या कथावस्तूत देखील नाही. प्रकाश नारायण संतांना या गोष्टींची गरजचं भासलेली नाहीये. त्यातली मजा आहे त्यातल्या व्यक्तिरेखा, तो परिसर, ती भाषा आणि एकूणच संतांनी उभं केलेल्या त्या एका वेगळ्याच जगामध्ये. त्या जगात धावपळ, ऑफिस, प्रमोशन, करियर, मान सन्मान, होमवर्क, पहिला नंबर, शिक्षणाचा व्यापार, बस, टीवी, मोबाईल, राजकारण या कशाकशाला स्थान नाही.  शाळा आहे. पण म्हणून होमवर्क, ट्युशन, कोचिंग क्लासेस यांची लंपन ला गरज नाहीये. शारदा संगीत विद्यालय आहे. पण तिथला प्रत्येक मुलगा आणि मुलगी कुठल्याही रियालिटी शो मधे भाग घेण्यासाठी गाणं शिकत नसून स्वतःसाठी शिकत आहेत.

धड लहानही नाही आणि धड मोठे ही नाही असं ते पौगंडावस्थेतील जग खूप खूप सुंदर आणि हवहवसं वाटतं हेच या पुस्तकांच्या यशा मागचं रहस्य. पु. लं. नी म्हणलंय तसं ‘एकदा नाही, दोनदा नाही, तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅड सारख्या वाचल्या तरी त्या ताज्याच वाटतात.’

लंपन च्या कथा वाचताना कित्येक जागी त्यात मला मी दिसतो. टारझन सारखं झाडावरून उडी मारताना, मॅडसारखं क्रिकेट खेळताना, सायकल पळवताना आणि अजून असंख्य वेळेस. जिथे जिथे मला मी दिसत नाही तिथे मी असा का नव्हतो हा विचार करून खूप वाईट वाटतं. मध्यंतरी मी आणि माझी एक मैत्रीण गप्पा मारत बसलो होतो तेव्हा ती मला म्हणाली ‘तुला लंपन एवढा का आवडतो माहित नाही. म्हणजे सगळी पुस्तकं सुंदर आहेत यात वाद नाहीच, पण सारखं वाचण्यासारखं काय आहे हे मला तरी कळत नाही. ती पुस्तकं वाचताना त्यात काही वेगळंच गवसल्याचा आनंद देणारं चित्र मला तरी दिसत नाही.’

मी म्हणलं ‘ते खरं ही असेल. पण प्रत्येक वेळेस ती पुस्तकं वाचताना मला माझंच बालपण गवसल्याचा आनंद होतो तो काय कमी आहे.’ तिला माझं बोलणं पटलं की नाही माहित नाही. पण दोन दिवसांनी ‘तुझ्या कडे शारदा संगीत आहे का रे?’ असं विचारायला तिचा फोन मात्र मला आला हे नक्की.

क्रमश:

Advertisements
 

टॅग्स: , , ,

12 responses to “लंपन चे भावविश्व – भाग १ (वनवास, शारदा संगीत) – प्रकाश नारायण संत

 1. Prashant Pole

  मे 7, 2013 at 8:27 सकाळी

  इंद्रनील, सुरेख मांडलंय तू लंपन चं भावविश्व. लंपन च्या भावविश्वाची चारही पुस्तकं ही कोणत्याही वयाच्या वाचकासाठी ‘रिफ्रेशिंग’ आहेत. मुख्यतः ती कालातीत आहेत. साधारण साठ च्या दशकात घडलेले / आलेले हे अनुभव. आजही ताजेतवाने वाटतात. मराठी साहित्याला पडलेलं एक सुरेख सोनेरी स्वप्न..!!

   
 2. Praveen

  मे 7, 2013 at 12:40 pm

  मस्तच आहे. “प्रत्येक वेळेस ती पुस्तकं वाचताना मला माझंच बालपण गवसल्याचा आनंद होतो” हे माझ्या बाबतित सुधा एकदम खरे आहे.

  खुपच छान लेख लिहला आहेस.

   
 3. indraneelpole

  मे 8, 2013 at 5:23 pm

  धन्यवाद प्रवीण 🙂 🙂

   
 4. sumedha pole

  मे 10, 2013 at 6:52 सकाळी

  mast ch ekdam!!!

   
 5. mrunal

  मे 11, 2013 at 9:48 सकाळी

  संतांचं नवीन पुस्तक चांदण्याचं बेट नाही… चांदण्याचा रस्ता आहे. आणि त्यात ललित लेख आहेत. लंपन च्या भावविश्वाशी निगडीत नसलेले आणि पुर्वप्रकाशित-अप्रकाशित असे लेख!!

  1964 नंतर 30 वर्षांनी पुढची गोष्ट लिहिली गेली, याचं कारण अतिशय सयंतपणे सुधा संत (सुप्रिया दिक्षित) यांनी आपल्या “अमलताश” या आत्मचरीत्रात्मक पुस्तकातुन लिहिलं आहे. सध्या मी देखील तेच पुस्तक वाचतेय.

  मृणाल

   
 6. indraneelpole

  मे 11, 2013 at 9:54 सकाळी

  हां चांदण्याचा रस्ता.. 🙂 अमलताश आणि चांदण्याचा रस्ता ही दोन्ही पुस्तकं हातात कधी पडतील याची आतुरतेने मी वाट पाहत आहे. तरीही तुम्हाला जर ते पुस्तक वाचून झाल्यावर त्यावर काही लिहावसं वाटलं तर मला नक्की कळवा. या ब्लॉग द्वारे आपण ते लोकांपर्यंत पोहोचवू.. 🙂 🙂

   
  • mrunal

   मे 19, 2013 at 12:09 pm

   amaltash vachun zala.. surekh pustak ahe.. tyachbarobar ajun ek pustak ahe.. te mhanje “lampanche bhav-vishwa” aani lekhak ahet vinayak gandhe.

    
 7. indraneelpole

  मे 24, 2013 at 7:09 pm

  Mrunal.. Nakkich donhi pustaka ghenar.. Vinayak gandhench pustak nakki kashavar ahe?

   
 8. navnathrao

  ऑक्टोबर 11, 2013 at 12:12 pm

  Khup khaan lekh ahe tujha ! Ha lekh vachun punha ekda char hi pustake parat vachavi as vatatay.
  Tya pustantil Santani kadhleli rekhachitre pan bhari ahet.

   
 9. indraneelpole

  ऑक्टोबर 11, 2013 at 12:57 pm

  Agdi kharay navnath.. Surekh rekhachitre..

   
 10. Nilesh Hiremath

  मे 14, 2014 at 12:34 pm

  Very good summary of the lampan’s stories. Request for correction , vantamungikar Desai should be read as vantamurikar. Desai. I am blessed to have lived in BGM. My parents have moved to the same area which lampan has depicted in his books. Another good thing is I understand most of the “mad” language lampan uses and we have grown up using it..

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: